www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ७ जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१३मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सात जून रोजीच आपल्या गुणपत्रिकेची प्रिंटआऊट काढता येणार आहे. तर १५ जूनला शाळांमध्ये दुपारी ३ वाजता मूळ गुणपत्रिका मिळतील, असे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट कऱण्यात आलेय.
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पाच वेबसाईट्सवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये http://mahresult.nic.in, www.msbshse.ac.in, www.mh-ssc.ac.in, www.rediff.com/exam, http://sscresult.mkcl.org,या वेबसाईट्चा समावेश आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मोबाईलवरही आपला निकाल पाहता येणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.