दहावीची गुणपत्रके शाळेत पाहा कधी मिळणार?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाला. 26 जूनला शाळेमध्ये निकाल पत्र मिळणार आहेत. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीची बाजी मारली आहे. राज्यात निकालाची टक्केवारी 88.32 आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 17, 2014, 04:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाला. 26 जूनला शाळेमध्ये निकाल पत्र मिळणार आहेत. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीची बाजी मारली आहे. राज्यात निकालाची टक्केवारी 88.32 आहे.
टक्केवारीत कोंकण विभागाची बाजी तर लातूर विभागाची टक्केवारी घसरली आहे. मुलांची टक्केवारी 86.47 असून मुलींची टक्केवारी 90.55 आहे.
निकालाची विभागवार टक्केवारी
- पुणे - 92.35%
- नागपूर -82.93%
- औरंगाबाद - 87.06 %
- मुंबई - 88.84 %
- अमरावती - 84.11%
- नाशिक - 89.15 %
- कोंकण -95.57 %
- लातूर - 81.68 %
- कोल्हापूर - 93.83 %
खालील वेबसाईट्सवर विद्यार्थांना निकाल पहाता येईन
- www.mahresult.nic .in
- www.maharashtraeducation.com
- www.sscresult.mkcl.org
- www.reddiff.com/exams

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.