ट्रायने आजपासून लागू केलेल्या नव्य नियमानुसार एक मोबाईलफोन धारक दिवसाला केवळ 100 एसएमएसचं पाठवू शकतो....आजपासून हा नियम देशभरातील 89 कोटी मोबाईलफोन धारकांसाठी लागू करण्यात आला आहे..जर तुम्ही शेअरमध्ये ट्रडिंग करत असाल किंवा कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर आजपासून तुम्हाला अलर्ट मेसेज येणार नाही..कारण ट्रायच्या नव्या नियमांनुसार रात्री 9 ते सकाळी 9 यावेळेत अशा प्रकारचे मेसेज पाठविण्यावर बंदी घालण्यात आली आहे..
पोस्टपेड ग्राहकांसाठीही ट्रायचे हे नियम लागू आहेत...पोस्टपेड ग्राहक महिन्याला 3 हजार पेक्षा जास्त एसएमएस पाठवू शकणार नाहीत.
ट्रायच्या या नव्या नियमावलीमुळं ऑपरेटर्स खडबडून जागे झाले आहेत..ट्रायने निश्चित केलेली मर्यादा अत्यंत कमी असल्याचं ऑपरेटर्सच म्हणनं आहे..
ऑपरेटर्सच म्हणनं काहीही असो मात्र ट्रायच्या म्हणण्यानुसार नको असलेल्या एसएमएसवर लगाम लावण्यासाठी हे नियम उपयोगी ठरतील...कारण अनावश्यक फोन कॉल्स आणि एसएमएसमुळं मोबाईलफोनधारक गेल्या काही वर्षांपासून त्रस्त झाला आहे...
ट्रायने नको असलेले कॉल्स आणि एसएमएसवर लगाम लावण्यासाठी नियम जारी केले असले तरी काही गोष्टींना त्यातून वगळण्यात आलं आहे....बँकिंग, रेल्वे , एअर लाईन्स संदर्भातले अपडेट अलर्ट आणि एकाच ऑफिसमधील कर्मचा-यांसोबतच डिस्ट्रिब्यूटर्सवर ही बंदी लागू होणार नाही..त्यामुळं या संदर्भातले अपटेड्स तुमच्या फोनवर येत राहातील...मात्र वजन कमी करण्याच्या नावाखाली किंवा लोनच्या नावाखाली येणारे फोन कॉल्स आणि एसएमएसवर निर्बंध येणार आहे..
जोरदारपणे घोषणा होईल, अशा भ्रमातही आपण राहू शकतं नाही.. कारण चार वर्षापूर्वी ट्राईने असचं अनावश्यक कॉलवर लगाम लावण्यासाठी काही नियम बनवले होते.. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. डू नॉट डिस्टर्बमध्ये नोंद होऊनही अजूनही ग्राहकांना टेलिमार्केटिंग कंपन्याचे मेसेजेस आणि कॉल्स येत असतात.. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा हाच सवाल आहे, आतातरी हे सारं थांबेल का ?
आज मोबाईलसेवा ही अत्यावश्यक सेवा बनून गेलीय.. आणि म्हणूनच एखादा येणारा अनावश्यक कॉल अथवा अनावश्यक एसमेस विनाकारण मनस्ताप देणारा ठरतोय...खरं तर ट्रायने यापूर्वीच क़डक पाऊले उचलायचं धोरण स्विकारलं होतं.. पण त्याची कडक अंमलबजावणी न झाल्याने हे दुखणं चिघळतचं गेल ..वेळीअवेळी येणा-या अनावश्यक कॉलमुळं मोबाईलफोन धारकांना आतापर्यंत नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.. यासंदर्भात मोबाईलफोन धारकांनी ऑपरेटर्सकडं वारंवार तक्रारी करुनही त्यावर काहीच उपयोग झाला नाही...
बहुतांश तक्रारीमध्ये ग्राहकांना अनावश्यक कॉलपासून मानसिक त्रास सहन करावा लागला..हे अनावश्यक कॉल आणि एसएमएस कसे बंद होती यासंदर्भात कुणाकडे आणि कशी प्रकारे तक्रार करावी याची माहिती ऑपरेटर्सकडून दिली जात नव्हती...त्यामुळं ग्राहकाचा रोष वाढत चालला होता..
प्रत्येक महिन्याला ऑपरेटरक़डे अनोळखी कॉलसंदर्भातील पन्नास हजार तक्रारी दाखल होत होत्या. चार वर्षात ऑपरेटर्सक़डं यासंदर्भात सुमारे दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त तक्रारींचा पाऊस पडला होता..पण यासंदर्भात काही ठराविक तक्रारीमध्येच कारवाई करण्यात आली..
मागील चार वर्षात केवळ 73 हजार नोंदणीकृत टेलिमार्केटींग कंपनी आणि एक लाख 12 हजार अनधिकृत टेलिमार्केटींग कंपन्यावर कारवाई करण्यात आलीय..
87 हजार टेलिमार्केंटिंग कंपन्याना पाचशे रुपये तर 41 हजार टेलिमार्केटींग कंपन्याना एक हजाराचा दंड ठोठावण्यात आलाय.. तसेच ट्रायने आतापर्यंत आठ आपरेटर्स कंपन्यावर कारवाई केलीय
ट्रायकडून कारवाई केली जात असतानाही टेलिमार्केंटिग कंपन्यावर कुठलाच फरक पडला नाही .. अनधिकृत एसमेस सेवा पुरवणा-या संस्थेकडून भरमसाठ एसमेस पाठवले जात होते. आणि एका नंबरवर कारवाई होताच दुस-या नंबरवर वरुन अनधिकृत सेवा सुरु केली जात होती.. क्वचीत प्रकरणात दंड द्यावा लागत असल्यामुळं टेलिमार्केटिंग कंपन्याही बिनदिक्कतपणे मोबाईल ग्राहकांना फोन क़ॉल्स आणि एसएमएस पाठिवत असत...मात्र त्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत होता.. ऑपरेटरही कारवाईकरुन उत्पनाचा मोठा स्त्रोत घालण्यापेक्षा अळिमिळी गुपचिळीचे धोरण स्विकारत होत्या.... पण अखेर ग्राहकांची या सा-यातून सुटका होणार