www.24taas.com, झी मीडिया, येवला
येवल्यात मत्स्यशेतीनं चमत्कार घडवलाय. सहा महिने उदरनिर्वासाठी स्थलांतर करणा-या आदिवासींच्या जीवनात बदल घडवलाय. कसा झालाय हा चमत्कार पाहूया आदिवासींची ही यशोगाथा.
ऊसतोड आणि वीटभट्टीचं काम करुन पोटाची खळगी भरण्यासाठी येवल्यातले आदिवासी बांधव पुणे, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात स्थलांतर करतात. हे स्थलांतर थांबावं आणि त्यांना परिसरातच रोजगार मिळावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी मत्स्यशेतीचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.
प्रवीणने त्यासाठी पाझर तलावात मत्स्यबीज सोडलं. त्यामुळं या तलावातून माशांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतंय.. त्यामुळं इथल्या आदिवासींना परिसरातच रोजगार मिळालाय.
या तलावामधून प्रतिदिवशी सध्या १० क्विंटल मासे उत्पादन मिळतंय. नांदगाव, वैजापूर, कोपरगाव या ठिकाणाहून व्यापारी मासे खरेदीसाठी येतायत.
या माशांच्या व्यवहारातून एका कुटुंबाला चांगलं उत्पन्न मिळतंय. त्यामुळं पोटासाठी होणारी आदिवासींची पायपीट थांबलीय. परसिरात रोजगार आणि चांगला बाजारभाव मिळत असल्यानं स्थानिक आदिवासींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ