www.24taas.com,रत्नागिरी
हे आहेत विनायक बंडबे. शिक्षण अवघं १२ वी पास. मात्र यंत्र दुरुस्तीत मग्न असलेल्या बंडबेंनी ट्रॅकवरून वीज निर्मितीचा अनोखा प्रयोग यशस्वी केलाय.
पाण्याअभावी राज्यातले वीज निर्मिती संच बंद पडत असताना त्याला पर्याय म्हणून त्यांनी अनोखी शक्कल लढवलीय. रेल्वे ट्रॅकसारख्या ट्रॅकवरून वीज निर्मितीचा त्यांनी यशस्वी प्रयोग केलाय. अशा माध्यमातून वीजनिर्मिती झाल्यास गरजेनुसार १०० ते २०० मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते.
प्रयोगाशिवाय या प्रणालीचा वापर करून डिझेल इंजिनच्या मदतीनं एका गावाला पुरेल एवढी वीजनिर्मिती करणंही शक्य असल्याचा दावा बंडबेंनी केलाय. विनायक बंडबेंची ही कल्पकता पाहून गावकरी भारावलेत.
या वीज निर्मिती प्रयोगाला बंडबेंनी मेड इन इंडिया पॉवर जनरेशन प्रकल्प असं नाव दिलंय. त्याच्या पेटंटसाठीही त्यांनी प्रस्तावही सादर केलाय. मात्र या प्रयोगात आणखी प्रगती करण्यासाठी त्यांना हवाय मदतीचा हात.