www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
चेन्नईत होणा-या आज बीसीसीआयच्या तातडीच्या बैठकीत श्रीनिवासन राजीनामा देणार का याकडे सर्वांच लक्ष लागलंय... आयपीएलचे कमिश्नर राजीव शुक्ला यांनी काल राजीनामा दिल्यानं आता श्रीनिवासन यांच्यावर चांगलाच दबाव वाढलाय.
बीसीसीआय सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के यांनी राजीनामा दिल्यानंतर शुक्लांनही आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयमधील तीन महत्त्वाच्या अधिका-यांनी सलग राजीनामे दिल्यानंतर आतातरी श्रीनिवासन आपली खुर्ची सोडणार का ? हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे.
श्रीनिवासन यांच्या बीबीसीआय अध्यक्षपदाचं काऊंटडाऊन सुरु झालंय बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीची बैठक आज चेन्नईमध्ये होणार आहे. श्रीनिवासन या बैठकीनंतर राजीनामा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शंशाक मनोहर यांना अंतरिम अध्यक्ष बनवलं जाणार असल्याची चर्चा आहे.
श्रीनिवासन यांचा गेमओव्हर
बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या गच्छंतीचा मुहुर्त हा रविवारचा निघाला आहे. चेन्नईमध्ये बीससीआयनं चेन्नईत तातडीची बैठक बोलविली आहे.
अजय शिर्के आणि संजय जगदाळे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीनिवासनं यांच्यावर दबाव वाढला होता..त्यानंतर वेगवान झालेल्या घडामोडीनंतर या बीसीसीआयच्या बैठकीचा निर्णय घेण्यात आला.
चेन्नई होणा-या बैठकीत श्रीनिवासव यांच्यावर मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे.श्रीनिवासनंया बैठकीत राजीनामा देण्याची शक्यता आहे .श्रीनिवासन यांच्याकडून हंगामी अध्यक्षपदी माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची अंतरिम अध्यक्ष निवड केली जाऊ शकते.मात्र याबाबत रविवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल..
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.