www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गणेशोत्सवाचा आजचा पाचवा दिवस... मुंबईसह अनेक ठिकाणी आज पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होतंय. तसंच तीन दिवस माहेरवाशिण म्हणून आलेल्या गौरींचंही आज विसर्जन होणार आहे.
त्यासाठी चौपाट्यांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. तसंच दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करताना भाविकांना स्टींग रे माशांमुळे भाविकांना त्रास झाला होता. त्यामुळे सावधगिरी म्हणून चौपाट्यांवर व्यवस्था करण्यात आलीय. लहान मुलांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आलीय तर मोठ्यांनी गम बूट घालूनच समुद्रात जावं, असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलंय.
नवसाला पावणारी गौराई
गौराईंचा तीन दिवसांचा हा उत्साह ठाण्यातल्या चंदेनी कोळीवाडा परिसरात गेली १०४ वर्षे पहायला मिळतोय. ठाण्यातली जवळपास सर्वात जुनी अशी आणि नवसाला पावणारी गौरी आहे. तीन दिवस या गौरींच्या दर्शनाला ठाणेकर मोठी गर्दी करतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.