www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी मतदारसंघाला विद्वान संसदपटूंचा वारसा आहे.... आपल्या अभ्यासपूर्ण कारकिर्दीनं संसद गाजवणा-या नाथ पै आणि मधू दंडवतेंचं नाव घेतलं तरी आजही इथल्या मतदारांचा ऊर भरून येतो..... काळाबरोबर हा मतदारसंघही बदलला.... सुसंस्कृत राजकारणाची जागा राडा संस्कृतीनं घेतली.... पाहुयात या मतदारसंघाचा झालेला कायापालट...
परशुरामाची भूमी म्हणून ओळखला जाणारा कोकणचा हा परिसर... रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ... हापूस आंबा, काजू, कोकम, नारळी पोफळीच्या बागा आणि लांबच लांब समुद्रकिनारा असं निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेला हा भाग... कोकणची माणसं साधीभोळी, असं इथल्या लोकांचं वर्णन केलं गेलं... पण गेल्या काही दशकांपासून राजकीय राड्यांमुळे पुरता बदनाम झालाय... दैव देतं आणि कर्म नेतं अशी काहीशी अवस्था या रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची झालीय....
मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी राजापूर नावानं ओळखला जाणारा हा मतदारसंघ... बहुतेक वेळा निवडणुकीचा पहिला निकाल लागायचा तो राजापूरचाच... नेहमीच सत्ताधा-यांच्या विरोधात हा मतदारसंघ उभा राहिलाय.. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून नावारूपाला आलेला हा मतदारसंघ म्हणजे नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारख्या बुद्धिवान संसदपटूंची कर्मभूमी.... पण 1990 च्या दशकात ही ओळख बदलली आणि समाजवादी विचारांची जागा शिवसेनेच्या भगव्यानं घेतली.... 2005 मध्ये नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पुनर्रचनेनंतर विस्तारलेला हा मतदारसंघही काँग्रेसकडे गेला.... कधी काळी हा मतदारसंघ
नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारख्या उत्तुंग संसदपटूंचा सार्थ अभिमान बाळगायचा. पण हा झाला इतिहास.... नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातल्या राजकीय धुमशानामुळे या मतदारसंघात नवी राडा संस्कृती रूजली...
1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत इथून काँग्रेसचे मोरेश्वर जोशी विजयी झाले होते. त्यानंतर 1957, 1962 आणि 1967 अशा सलग तीन निवडणुकांत बॅरिस्टर नाथ पै निवडून आले. नाथ पै यांच्या अकाली निधनानंतर प्राध्यापक मधू दंडवते त्यांचे वारसदार ठरले आणि 1971, 1977, 1980, 1984 आणि 1989 अशा सलग पाच निवडणुकांत समाजवादी मधू दंडवते यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टी, भारतीय लोकदल आणि जनता पार्टीच्या तिकिटावर विजय मिळवले.... त्यानंतर मात्र या मतदारसंघात शिवसेनेचा जोर वाढला आणि 1991 मध्ये जनता दल, काँग्रेस आणि शिवसेना अशा तिरंगी लढतीत काँग्रेसचे सुधीर सावंत या मतदारसंघातून निवडून आले.. मधू दंडवते यांच्या पराभवाबरोबर समाजवादी पक्षांचं इथलं अस्तित्वही संपलं. तीन दशकांनंतर काँग्रेसकडे गेलेला हा मतदारसंघ पुढे शिवसेनेनं बळकावला आणि 1996, 1998, 1999 आणि 2004 असं सलग चारवेळा शिवसेनेच्या सुरेश प्रभूंनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. पुढे राणे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेबरोबर इथली राजकीय समीकरणंही बदलली. 2009 मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या नावानं विस्तारलेल्या या मतदारसंघात राणे आणि शिवसेनेत घमासान संघर्ष झाला. नारायण राणेंचे पुत्र डॉक्टर निलेश राणेंच्या रुपानं पुन्हा काँग्रेसनं या मतदारसंघावर नाव कोरलं....
या लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आघाडी आणि युती यांच्याकडे प्रत्येकी तीन-तीन आमदार आहेत. चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण आणि राजापूरमध्ये राजन साळवी हे शिवसेनेचे आमदार आहेत. राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली-देवगड मतदारसंघात गेल्यावेळी भाजपच्या प्रमोद जठारांनी कमळ फुलवलं.... तर रत्नागिरीध्ये राज्यमंत्री उदय सामंत आणि सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर हे राष्ट्रवादीचे शिलेदार आहेत. उद्योगमंत्री नारायण राणे ज्याचं प्रतिनिधीत्व करतात तो मालवण-कुडाळ हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसकडे आहे.
बॅरिस्टर नाथ पै ते डॉक्टर निलेश राणे असा प्रवास करणारा हा मतदारसंघ कधी लाटेविरोधात उभा राहिला, कधी लाटांवर स्वार झाला... या मतदारसंघानं अनेक संघर्षही पाहिले... सध्या या निसर्गरम्य भूमीवर सामाजिक, आर्थिक प्रश्नांबरोबर राजकीय संघर्षही जोरात सुरू आहे....
विकास गावकर आणि संदेश सावंतसह दिनेश दुखंडे, रत्नागिरी सिंधुदुर्ग
विद्वान आणि अभ्यासू लोकप्रतिनिधींचा हा मतदारसंघ.... पूर्वी नाथ पै किंवा मधू दंडवते उभे राहिले की त्यांचा विजय हा केवळ औपचारिकता असायची.... 1996पासून सुरेश प्रभू असोत की नीलेश राणे, त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेत अर्थातच नारायण राणेच.... मतदारसंघातल्या राणे फॅक्टरव