www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेसने राहुल गांधी यांची काळजी घ्यायला आतापासून सुरूवात केली आहे. कारण एक्झिटपोलमध्ये काँग्रेसचा पराभव होतांना दिसतोय. या पराभवाचं खापर राहुल गांधीवर फुटणार
नाही, यासाठी काँग्रेसमध्ये खलबतं सुरू असल्याचं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीत अपयश येणार याची जाणीव झालेल्या काँग्रेसने आता राहुल गांधींवर पराभवाचे खापर फुटू नये, यासाठी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी एक्झिट
पोलचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच कॉंग्रेसने निकाल काहीही लागू देत, राहुल गांधींच्या नेतृत्त्वाचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला तर त्याची जबाबदारी सामूहिक असल्याचे पक्षाचे अखिल भारतीय कॉंग्रेसच सरचिटणीस शकील अहमद यांनी म्हटले आहे.राहुल गांधी हे यूपीए
सरकारमध्ये नव्हते. पक्षातही त्यांचे स्थान दुसऱया क्रमांकावर आहे. सोनिया गांधी यांच पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्याचबरोबर प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरही पक्षाचे नेतृत्त्व आहे.
त्यामुळेच पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
दरम्यान, पक्षाच्या काही मंत्र्यांनी खासगीमध्ये बोलताना निवडणुकीच्या प्रचारयंत्रणेत समन्वय नव्हता, असे म्हटले आहे. कॉंग्रेससाठी ही आत्तापर्यंतची सर्वांत अवघड निवडणूक होती. हे
खरं असलं, तरी पक्षाचे सर्वजण एकत्रितपणे लढले नाहीत, असे एका केंद्रीय मंत्र्याने सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.