www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुजरात विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज होणार आहे. या अधिवेशनात नरेंद्र मोदी विधानसभेला संबोधित करणार असून त्यानंतर दुपारी ते आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे देणार असल्याची माहिती आहे.
आज संध्याकाळी गुजरात भाजप विधीमंडाळीची बैठक होणार असून या बैठकीत मोदींच्या उत्तराधिकाऱ्याची निवड होणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आनंदीबेन पटेल यांच नाव चर्चेत आहेत. आनंदीबेन हे गुजरात सरकारमधील वरिष्ठ मंत्री असून सध्या त्यांच्याकडे महसूल खात्याचा कारभार आहे. मोदींची पंतप्रधानपदासाठी कालच अधिकृतरित्या निवड करण्यात आलीय.
आनंदीबेन पटेल यांच्या कार्यकाळावर एक नजर...
* गुजरातच्या राजकारणातलं प्रभावशाली व्यक्तीमत्व
* गुजरात कॅबिनेटमध्ये रस्ते आणि बांधकाम, महसूल, नगरविकास मंत्री
* नरेंद्र मोदी आणि केशूभाई पटेल यांच्या इतकचं गुजरातमध्ये महत्त्व
* 1994 मध्ये राज्यसभेतून राजकीय कारकिर्दीला सुरूवात
* 1998 मध्ये गुजरात विधानसभेत निवड
* सलग 4 वेळा गुजरात विधानसभेवर निवडून गेलेल्या पहिल्या महिला आमदार
* प्रशासनावर असलेली उत्तम पकड ही आनंदीबेन पटेल यांची जमेची बाजू
* गुजरातच्या सर्वच भागाचा आनंदीबेन यांचा गाढा अभ्यास
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.