www.24taas.com, झी मीडिया, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा फाशी बद्दल आपले मत मांडले आहे. मुलायम सिंग यांच्या फाशी विरोधी वक्तव्याचा विरोध करत, पक्षातील कुठली ही व्यक्ती या वक्तव्याशी सहमत नसल्याचे त्यांनी सांगितले. अखिलेश यादव औरेयामध्ये एका प्रचार सभेत बोलत होते.
मुंबईमध्ये एका फोटो जर्नलिस्ट सोबत झालेल्या बलात्काराबद्द्ल बोलताना समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांनी `मुलांकडून चूक होऊन जाते. यासाठी फाशी देण्याची गरज काय?` असे वादग्रस्त विधान केले होते. या गोष्टीचा विरोध करत, अखिलेश यादव यांनी सांगितलं की,"बलात्कार करणाऱ्यांना फाशीपेक्षा कठोर शिक्षा दिली पाहिजे".
तसेच अखिलेश यादव पुढे म्हणाले,"मुलायम सिंग यांचे वक्तव्य नीट समजून घेतले नाही. तसेच महिलांबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मुलायम सिंग यांना या आधी देखील त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.