लोकसभा निवडणूक - यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 22 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 17, 2014, 12:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 20 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे - उपमुख्यमंत्री अजीत पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुरेश कलमाडी, राळेगणसिद्धी - समाजसेवक अण्णा हजारे, नांदेड - अशोक चव्हाण, छत्तीसगड - मुख्यमंत्री रमण सिंग, बारमेर - जसवंत सिंग
बंगळुरू - भाजप नेते व्यंकय्या नायडू, पाटणा - भाजप नेते सी पी ठाकूर यांनी आपला हक्क बजावला.
सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.
साता-याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनीही मतदानाचा अधिकार बजावलाय. उदयनराजेंबरोबरच एकुण 18 उमेदवार आपलं नशिब आजमावतायत. साता-यात एकूण 2943 मतदान केंद्रे आहेत.
शिर्डी येथे चंद्रभागा निवृत्ती बोरावके या ९८ वर्षाच्या वृद्ध महिलेने सर्वात पहिले सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी मतदान करून इतरांच्या पुढे आदर्श निर्माण केलाय. यावेळी त्यांच्या सोबत मुलगा, नातू, सुना होत्या. शिर्डीमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत वाजेपर्यत 15 टक्के मतदान झालंय. बहुतांशी मतदारांनी सपत्नीक मतदान करण्याच पसंत केलंय.
मावळ मतदार संघातील पनवेल आणि उरण तालुक्यात सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येतोय. मावळ मतदारसंघात शेकाप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत आहे.
मराठवाड्यात बीडमध्ये लक्षवेधी लढत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे सुरेश धस अशी लढत आहे. गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनजंय मुंडे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय. मतदारांचा सकाळपासून उत्साह दिसून येतोय.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात तुंबळ लढत होतेय. नीलेश राणे विरुद्ध विनायक राऊत या लढतीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचीही किनार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत यांना मात्र काँग्रेसच्या विजयाचा विश्वास वाटतोय. तर शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी लांजातील एका केंद्रावर जाऊन पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.
सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात मतदान केलंय. तर माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील आणि याच मतदार संघात त्यांचे बंधू आणि अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे मतदान केलंय. सकाळीच या नेत्यांनी मतदान केलंय.
सोलापूरमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून मतदानाचा हक्क बजावणा-या महमूद इनामदार यांनी आपल्या वयाच्या ९४ वर्षी मतदान केलंय. तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह होता
दक्षिण बंगळुरूमधून काँग्रेसचे उमेदवार नंदन निलकेणी यांनी मतदान केलं. निलकेणींचा थेट सामना भाजपचा अनंतकुमार आणि आपच्या नीना नायक यांच्याशी आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार सलग पाच टर्म दक्षिण बंगळुरूमधून खासदार आहेत.
नंदन निलकेणी हे युआयडी योजना म्हणजेच आधार कार्डाचे थिंकटँक मानले जातात. इन्फोसिस या अग्रणी आयटी कंपनीचेही ते माजी संचालक होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.