www.24taas.com, झी मीडिया, वडोदरा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडे दीड कोटी रूपयांची संपत्ती आहे. वडोदऱ्यावरून उमेदवारी अर्ज भरतांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.
नरेंद्र मोदी यांनी मागील वेळी दिलेल्या संपत्तीत फारशी वाढ झालेली दिसत नाही.
मोदींची प्रॉपर्टी वाढली
आपल्या प्रतिज्ञापत्रात पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्नीच्या नावाचा उच्चार केला आहे.
मोदींनी आपल्या प्रतिक्षापत्रात आपल्या पत्नीचं नाव जसोदाबेन लिहलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 2012 मध्ये याविषयी कोणतीही माहिती दिली नव्हती.
प्रतिज्ञापत्रात मोदींनी जसोदाबेन यांची कोणतीही संपत्ती नसल्याचं म्हटलं आहे. प्रतिज्ञापत्रात नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती 1 कोटी 51 लाख, 57 हजार रूपये असल्याचं म्हटलं आहे.
मोंदींकडे 29 हजार 700 रूपयांची रोकड आहे. बँकेत 11 लाख 74 हजार 394 फिक्स्ड डिपॉझिट, इन्फ्रास्ट्रक्ट बॉण्ड 20 हजार रूपये आणि 4 लाख 34 हजार 31 रूपयांची एनएससी आहे.
याशिवाय गुजरातमधील गांधीनगरमध्ये एक प्लॉट असल्याची माहिती आहे, या प्लॉटची किंमत 1 कोटी रूपये आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही गाडी नाहीय.
नरेंद्र मोदी यांनी 2012 साली विधानसभेसाठी अर्ज दाखल केला होता, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी 33 लाख रूपये होती, नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत 18 लाख रूपये वाढले आहेत.
मोदींनी दिलेल्या माहितीनुसार 1983 मध्ये मोदींनी गुजरात युनिवर्सिटीतून राज्यशास्त्र विषयात एमए केलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.