माचिसच्या काडीनं मिटवता येते मतदानाची शाई!

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचं दोनदा मतदान करण्याचा सल्ला तुम्हीही ऐकलाच असेल... पण, बोटांवर शाई असताना दुसऱ्यांदा कसं मतदान करणार? हा त्यांना न पडलेला सल्ला तुम्हाला जरुर पडला असेल...तर

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 29, 2014, 09:44 PM IST

www.24taas.com, जी मीडिया, मुंबई
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचं दोनदा मतदान करण्याचा सल्ला तुम्हीही ऐकलाच असेल... पण, बोटांवर शाई असताना दुसऱ्यांदा कसं मतदान करणार? हा त्यांना न पडलेला सल्ला तुम्हाला जरुर पडला असेल... मतदानाचं बोटावरचं शाईचं निशान लवकरात लवकर मिटवणं शक्य नाही असं तुम्हाला वाटत असेल हे निशान मिटवता येतं... आणि तेही माचीसच्या काडीनं... केवळ काही मिनिटांत हे ऐकलं तर तुम्हाला तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे.
कर्नाटक सरकारचा उपक्रम `मैसूर पेन्टस अॅन्ड वार्निश लिमिटेड` (एमपीवीएल) अनेक वर्षांपासून मतदानासाठी लागणारी शाई पुरवण्याचं काम करते. या शाईत २५ टक्क्यांपर्यंत सिल्वर नायट्रेट असतं. हे खूप महागडं रसायन असतं परंतु, त्याचं निशाण मिटवणं अगदी काही मिनिटांचं काम आहे, असा दावा 'मिड डे'नं केलाय.
या शाईला ज्या बोटावर लावलेलं असेल त्यावर थोड पाणी टाकून माचिसच्या ग्लुकोजनं थोडं घासलं तर ही शाई काही मिनिटांत निघून जाते. त्यामुळे, निवडणूक आयोगाचा `मतदानाची शाई लवकर मिटविता येत नाही` हा दावा सपशेल फोल ठरतो.
महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शाई मिटवून पुन्हा मतदान करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. २३ मार्च रोजी नवी मुंबईतील एक सभेत त्यांनी जनतेला दोनदा मतदान करण्याचा सल्ला दिला होता. साताऱ्यात १७ एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर ती शाई मिटवून २७ एप्रिलला नवी मुंबईत मतदान करण्याचं यावेळी म्हटलं होतं. हे प्रकरण अंगाशी आल्याचं समजल्यानंतर आपण हे वक्तव्य गमतीनं केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.