www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांकडून पुढील 100 दिवसात काय काम करणार आहात, याची माहिती सादर करण्यास सांगितली आहे.
मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे 100 काय, तर संपूर्ण पाच वर्षे कल्पकतेने विकास कामं करण्याची तयार असावी, असं त्यांच्य़ा बोलण्यावरून वाटतंय.
जम्मू-काश्मीर आणि पूर्वांचलच्या भागातील रस्त्य़ांना प्रथम प्रधान्य देणार येणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
आश्वासक गडकरींचं पारदर्शक धोरण
नितिन गडकरी खूपचं आश्वासक आणि माहितीपूर्ण बोलत होते, रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करून वाहतूक जास्तच जास्त कशी सोयीची करता येईल, यावर गडकरींची आयडीया स्पष्ट असल्याचं दिसून येत होतं.
राष्ट्रीय़ महामार्गांचं चौपदरीकरण, गंगेच्या काठावर धार्मिक पर्यटन, गंगा जलशुद्धीकरण, इथेनॉलचा वापर वाढवून पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनाचा ताण कसा कमी करता येईल, याविषयी गडकरींनी आपलं मत आज गडकरींनी पत्रकार परिषदेत मांडलं.
इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या भारतात कशा येतील, प्रमुख कार कंपन्यांना यांना धोरण कसं समजवून सांगता येईल, पर्यावरणाची हानी कशी कमी करता येईल, याविषयी गडकरींनी आज आपली कल्पना स्पष्ट केली आहे.
कोणतंही काम करतांना ठेकेदारांकडून कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन करण्याचं सरकारने ठरवलं आहे, कारण दिरंगाईचा फटका शेवटी देशाच्या जनतेलाच बसतो, असंही नितिन गडकरी यांनी सांगितलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.