मुंबई : आपले पालक, आजी-आजोबा नेहमी रात्रीचे जेवण लवकर घेण्यासाठी आग्रही असतात. मात्र, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करणे तुम्हाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. रात्रीचे जेवण घेतल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात.
आयुर्वेदात रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घेणे केव्हाही चांगले. सूर्यास्तानंतर एक तासाने रात्र सुरु होते. रात्रीचा काळ हा चार टप्प्यांमध्ये विभागला आहे. निसर्ग चक्र आणि शरीराची सायकल निसर्ग चक्राशी जुळणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात जेवण घ्यावे. त्यामुळे आपली अनेक रोगांपासून सुटका होते आणि आपण निरोगी राहतो.
लवकर जेवल्यामुळे आपल्या लठ्ठपणाला प्रतिबंध लागतो. सूर्यास्त झाल्याने आपल्या शरीराची पचन होण्याची क्रिया कमी होते. त्यामुळे उशिरा खाल्ले तर ते पचायला जड जाते. अन्न पचले नाही तर अनेक रोगांना आणि कारणांना तोंड द्यावे लागते. वजन वाढने, जास्त चरबी वाढणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
रात्री उशिरा जेवल्याने पित्त वाढण्यास मदत होते. त्यामुळे आंबटपणाचे ढेकर येतात. झोप चांगली लागत नाही. तसेच लैंगिकदृष्टी कार्यशील समस्याही निर्माण होते. रात्रीचे जेवण लवकर घेणे आणि लवकर झोपणे हे आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही चांगले. रात्रीचे जेवण व झोप यांच्यामध्ये कमीत कमी दोन तासांचे अंतर असावे.
रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी म्हणजे सायंकाळी ७च्या दरम्यान करावे. रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा हलके असावे. यात मुगाची खिचडी, मुगाचे पीठ लावलेली कढी व भात, मऊ तूप भात, भाज्यांचे सूप व भूक चांगली असल्यास तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी यांचा समावेश असावा.
दरम्यान, सकाळी उठल्यावर उपाशीपोटी भरपूर पाणी पिणे, जेवण्यापूर्वी पाणी पिणे, तहान न लागताच पाणी पिणे, अतिशय गरम व अतिशय थंड पाणी पिणे यामुळे जाठराग्नीची व आमाशयाची दुष्टी होते, अन्नपचन बिघडते. आमनिर्मिती होते. त्यामुळे उकळून निम्मे आटवलेले कोमट पाणी तहान लागेल तेव्हाच पिणे फायद्याचे असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.