मुंबई : चिकन खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. वैज्ञानिकांना पहिल्यांदाच कमी शिजलेल्या चिकनमध्ये काही बॅक्टेरिया आढळला आहे. ज्यामुळे लकवा किंवा पॅरेलिसीसचा धोका संभवतो असं अमेरिकेच्या मिशिगन स्टेट यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या निष्कर्षात सांगितलं आहे. अयोग्य प्रमाणे शिजवलेल्या चिकनमध्ये कँपाइलोबॅक्टर जेजुनी नावाचा बॅक्टेरिया आढळला आहे.
हा बॅक्टेरिया शरीरात एका अशा विकाराला जन्म देतो ज्यामुळे पॅरेलिसीस होऊ शकतो. एका योग्य तापमानात जर चिकन नाही शिजवलं तर यामध्ये ते बॅकटेरिया तसेच राहून जातात. या बॅकटेरियामुळे पेशी कमजोर होणे, पेशी संकुचन पावतात त्यामुळे लकवा होण्याची शक्यता असते. या बॅक्टेरियामुळे औषधं देखील काम करत नाहीत.
ऑटोइम्यूनिटी जर्नलमध्ये आलेल्या माहिती नुसार अँटीबायोटिक घेतल्यानंतर पेशी अधिक गतीने संकुचन पावतात. मग जे शरीरासाठी उपयोगी असतात ते या बॅक्टेरियामुळे शरीराला नुकसान पोहोचवतात.