मुंबई : आज मकरसंक्रांती... तिळाचे लाडू, पापड्या... असे अनेक पदार्थ तुम्हाला या निमित्तानं खायला मिळतील. पण, या तिळाचं तेलही तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का?
तिळामध्ये मिनरल्स, ओमेगा फॅटी अॅसिड असे तुमच्या शरीराला उपयोगी ठरणारे पोषणद्रव्य आढळतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात तीळाचा गोडाच्या पदार्थांसोबत जेवणातही वापर करतात.... तिळाची भाकर तुम्ही खाल्लीच असेल... नसेल तर नक्की खा.
या दहा कारणांसाठी तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर सुरू करायला हवा...
तेलाचा मसाज केल्यानं आरोग्य सुधारण्यास मदत होते. डोकं आणि शरीर तेलाने मसाज केल्यास फायदेशीर ठरते. तीळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि ताण कमी होतो.
२. त्वचा मॉईश्चराईज करण्यासाठी
नैसर्गिकरित्या त्वचेला पोषण आणि मुलायमता देण्यासाठी तीळाचे तेल फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये तेल खोलवर झिरपते त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेत तीळाचे तेल अधिक फायदेशीर ठरते.
३. हृद्याचे आरोग्यसाठी
तीळाच्या तेलामध्ये लिनोलेइक अॅसिड हे ओमेगा ६ फॅटी अॅसिड आढळते. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते आणि आवश्यक कोलेस्ट्रेरॉल वाढते. तसेच यामध्ये मॅग्नेशियम,सेलेनियम आणि कॅल्शियम आढळते. यामुळे हृद्याचे स्नायू बळकट होतात.
४ हाडांचे आरोग्यासाठी
लहान बाळांना तीळाच्या तेलाने मसाज करावा असे आयुर्वेद सांगते. तीळाच्या तेलाने हाडं मजबूत होतात तसेच बाळाची वाढ सुधारते. नियमित तीळाच्या तेलाने मसाज केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. वाढत्या वयानुसार ते ठिसूळ होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे ऑस्ट्रोपोरायसिसचा धोकाही कमी होतो.
५. गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर
गर्भवती स्त्रियांनी आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करावा. यामधील फोलिक अॅसिड गर्भाच्या सुदृढ वाढीसाठी मदत करते. यामुळे डीएनएचे सिंथेसाईज तसेच बाळाची वाढ योग्यरित्या होते.
६. स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी
गरोदरपणाच्या काळात स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी तीळाच्या तेलाचा मसाज करावा.
७. तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी
दातांमधील प्लाग काढण्यासाठी तीळाच्या तेल फायदेशीर ठरते. यामुळे दात नैसर्गिकरित्या शुभ्र होतात. तसेच बॅक्टेरियाचा नाश झाल्याने टुथ इनॅमलचेही संरक्षण होते.
८. शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी
शरीरात पित्ताचा त्रास वाढला असल्यास, आठवड्यातून किमान दोनदा तीळाच्या तेलाने मसाज करा. पित्तामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. मात्र तीळाच्या तेलाचा अतिवापर करू नका.
९. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी
तीळामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावरही नियंत्रण राहते. राईस ब्रान आणि तीळाचे तेल हे रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरते असे काही संशोधनातून समोर आले आहे.
१०. व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी
योनीमार्गातील शुष्कता कमी करण्यासाठी आहारात तीळाचे तेल अवश्य वापरावे. तीळाचे तेल नॅचरल ल्युब्ररीकंट असल्याने व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.