नवी दिल्ली: दिल्लीत डेंग्यूनं कहर माजवल्यानंतर प्रशासनाच्या दुर्व्यवस्थेची पोलखोल होतेय. योग्य पद्धतीनं उपचार न झाल्यानं मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या सतत वाढतेय. दिल्लीत आता परिस्थिती अशी आहे की, लोकं आपल्या कुटुंबाला डेंग्यूपासून वाचविण्यासाठी प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करतायेत. त्यात औषधांपासून घरगुती उपायांपर्यंतच्या सर्व पद्धती ते वापरत आहेत.
आणखी वाचा - अॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपाय
घरगुती उपचारांमध्ये पपईची पानं आणि बकरीचं दूध डेंग्यूपासून आराम देण्यास मदत करते. अशात आता सर्व जण पपईची पानं आणि बकरीच्या दुधाचा जास्त उपयोग करत आहेत. त्यामुळं या दोन्हींची किंमत आणि मागणी झपाट्यानं वाढतेय. आता लोकं बकरीचं दूध तब्बल २००० रुपये लीटर आणि पपईची पानांपासून बनलेले औषधं १००० रुपयांपर्यंत विकत घेत आहेत.
आणखी वाचा - नारळ पाणी पिण्याचे पाच फायदे
साधारण पणे बकरीचं दूध बाजारात अवघ्या ४० रुपयांपासून ५० रुपये प्रति लीटरपर्यंत उपलब्ध असतं. मात्र आता परिस्थिती अशी आहे की लोकांना ते शोधावं लागतंय. आयुर्वेदात याबाबत सांगण्यात आलंय की, पपईची पानं आणि बकरीचं दूध डेंग्यूपासून बचाव करतात. सध्या दिल्लीत बकरीचं दूध विकणारे याच संधीचा फायदा घेत आहेत आणि पैसे कमवत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.