मुंबई: मेथीचे दाणे हे भारतीय स्वयंपाक घरातील औषधी गुण असलेला मसाला. गुणकारी मेथीची भाजी, औषधी वनस्पती आहे. मेथीच्या दाण्यांची चव अतिशय कडवट असते. यात कर्बोदके, प्रथिनं, फॅास्फरस आणि लोह सारखे अनेक विविध पोषक तत्व असतात. या तत्वाचा आरोग्याला मोठा फायदा होतो.
१. शरीरातील रक्तातून कॉलेस्ट्रोल कमी करण्याचं महत्त्त्वपूर्ण कार्य मेथीचे दाणे करतात
२. या दाण्यांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयरोगांचा धोका टळतो
३. यात फायबरचे गुण असल्यामुळे पचन क्रिया सुरळीत होऊन पोटांच्या आजारांपासून सुटका मिळते
४. मेथीचे दाणे खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
५. या दाण्यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामुळे मधुमेहा सारखा आजार होत नाही.