न्यूयॉर्क : आपल्या मुलांना भरवणं प्रत्येक आई-बाबाचं आवडतं काम... होय ना... पण, तुम्ही जर तुमच्या चिमुरड्यांना जबरदस्तीनं त्याला भूक नसतानाही भरवत असाल... तर सावधान!
नुकत्याच प्राकशित झालेल्या एका संशोधनानुसार, लहान मुलांना जबरदस्तीनं भरवणं तुम्हाला महाग पडू शकतं. कारण असं केल्यानं मुलांचं वजन उगाचच वाढतं... आणि हे त्यांच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे.
खाण्याची योग्य सवय लहान मुलांनाही लागावी यासाठी मुलांना स्वत: ठरवू द्या की त्यांना किती खायचंय?
अभ्यासानुसार, जर लहान मुलांना प्लेटमध्ये उरलेला एक - एक दाना खायलाही जबरदस्ती केली तर ते आपल्या शरीराचे संकेत समजणं बंद करतात आणि तेव्हापर्यंत खात राहतात जेव्हापर्यंत त्यांचे आई-वडील त्यांना भरवत राहतात.
'नॉर्वे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी'मध्ये सहाय्यक प्रोफेसर सिल्जे स्टेनस्बॅक यांच्या म्हणण्यानुसार, काही मुलांचं बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) इतरांच्या तुलनेत का वाढतं? हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या शारीरिक हालचाली, टीव्ही पाहण्याच्या वेळा तसंच भूक या गोष्टींवर लक्ष ठेवलं.
हा शोध दीर्घकालीन अभ्यासाचा भाग आहे.... यात अनेक वर्ष मुलांचं मनोवैज्ञानिक तसंच मनो-सामाजिक विकासाचा अभ्यास केला जातो. हा अभ्यास 'पीडियाट्रिक सायकोलॉजी'मध्ये प्रकाशित झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.