मुंबई : कडुनिंबांचा उपयोग अनेक धार्मिक विधींमध्ये तसेच औषधांमध्ये केला जातो. सणसमारंभातही कडुनिंबाचे विशेष महत्त्व आहे. याचे अनेक गुणकारी फायदेही आहेत.
त्वचेसंबंधी विकारावर गुणकारी आहे कडुनिंब. कोणत्याही प्रकारची त्वचेला अॅलर्जी झाल्यास कडुनिंबाच्या पानांचा वापर करावा.
त्वचेवर पुळ्या,पुटकुळ्या आल्यास कडुनिंबाच्या पानाचा वापर फायदेशीर ठरतो.
दातांच्या आरोग्यातही कडुनिंबाचा पानांचा वापर होतो. कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांचे आरोग्य सुधारते.
चेहऱ्यावर डाग, मुरुमे आल्यास त्यावरही कडुनिंबाच्या पानांचा फायदा होतो. कडुनिंबाच्या पानांचा रस लावल्यास मुरुमे, डाग कमी होतात.