मुंबई : जपानच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार अविवाहित पुरुषांच्या विवाहित पुरुषांची शरीर सुडौल असते.
वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधानातून असे समोर आले की वैवाहिक जीवन जगणाऱ्या पुरुषांचे शरीर अविवाहित पुरुषांच्या तुलनेने सुडौल राहते.
डेली मेलच्या वृत्तानुसार विवाहित पुरुषांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिड्रोम यांसारखे आजार होण्याची शक्यता कमी असते.
योकोहोमा सिटी विद्यापीठाच्या योशिनोबु कोंडो यांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित पुरुषांमध्ये लठ्ठपणाचा धोका 50 टक्के कमी असतो. वैज्ञानिकांच्या मते लग्न झालेले पुरुष चांगल्या खाण्यापिण्यावर तसेच आरोग्याकडे अधिक लक्ष देतात.
या संशोधनात 270 लोकांचा समावेश करण्यात आला. ज्यात 180 जण विवाहित होते तर 90जण अविवाहित होते. रिसर्चनुसार, विवाहित लोकांच्या तुलनेत अविवाहित लोकांमध्ये लठ्ठपणाचा धोका 50 टक्के अधिक आढळून आला.