मुंबई : प्रमाणापेक्षा जास्त बिस्कीट खाण्याची सवय तुम्हाला असेल तर सावधान... बिस्कीटही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.
‘डेली मेल’ वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या शोधानुसार बिस्कीटांच्या अति सेवनामुळे स्मरणशक्ती कमी होत जाते.
‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या संशोधकांनी एक हजार लोकांवर यासंबंधीत एक प्रयोग केला. यामध्ये, स्मरणशक्ती कमी करणारा मेजर फॅक्टर म्हणजे 'ट्रान्स फॅट्स' या बिस्कीटातील प्रकारामुळे राग येणं, लठ्ठपणा तसंच हृदयाचे विकार होऊ शकतात.
बिस्कीट खाण्याचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये जास्त असल्याने वेळेतच याला आटोक्यात आणणे हे योग्य ठरेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.