नवी दिल्ली : केसांना अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळी प्रोडक्टसचा वापर आपण विचार न करता सर्रास करत असतो. यामुळे आपणच आपल्या केसांचे शत्रू कधी होऊन जातो हे कळतही नाही. नवी दिल्लीच्या केसांच्या तज्ज्ञ सोनिया मंगल यांनी याच गोष्टीवर लक्ष वेधून घेतलंय. सोनिया यांच्या मते आपल्या केसांची दुर्दशा करणारे आपण स्वतः आहोत. याचसंबंधी त्यांनी काही टीप्स दिल्या आहेत.
स्ट्रेटनरचा उपयोग : आपल्या केसांना स्ट्रेट करण्यासाठी या स्ट्रेटनर उपयोग केला जातो पण त्यामुळे केसांचे फार नुकसान होते. स्ट्रेटनरचा थेट प्रयोग केसांवर केल्यामुळे केस रूक्ष, निष्प्राण तसेच चिकट होतात.
गरजेपेक्षा जास्त विंचरणे : केस जास्त वेळा केसांवर कंगवा फिरवल्यानं केस गळायला सुरूवात होते. ओले केस विंचरले तरीही केस गळण्याचा धोका जास्त असतो.
रोज-रोज शॅम्पूचा वापर : रोज शॅम्पूचा वापर केल्याने केस रूक्ष वाटायला लागतात शिवाय शॅम्पूमध्ये केमिकल्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे केस गळायला सुरूवात होते.
केस सुकवण्यासाठी टॉवेलचा वापर : केस सुकवण्यासाठी सगळेच टॉवेलचा उपयोग करतात. पण तसे करणे चुकीचे आहे. टॉवेलचा वापर केल्यामुळे केसांची मुळं तकलादू होतात आणि शेवटी केस तुटायला लागतात.
खाण्यासंबंधीच्या सवयी : रेशमी तसेच दाट केसांसाठी विटॅमिन ए, सी तसेच ई चा समावेश आपल्या आहारात असणं गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.