सावधान! पेनकिलर खाण्यापूर्वी हे वाचा....

आपल्यावर अनेकवेळा अशी वेळ येते की आपल्याला पेन किलर गोळ्या घ्याव्या लागतात. विशेष करून आस्टिओ आणि आर्थराइटिसच्या रुग्णांना अधिक प्रमाणात पेनकिलरचे सेवन करण्याची सवय होऊन जाते. 

Updated: Dec 5, 2014, 05:41 PM IST
सावधान! पेनकिलर खाण्यापूर्वी हे वाचा....  title=

मुंबई : आपल्यावर अनेकवेळा अशी वेळ येते की आपल्याला पेन किलर गोळ्या घ्याव्या लागतात. विशेष करून आस्टिओ आणि आर्थराइटिसच्या रुग्णांना अधिक प्रमाणात पेनकिलरचे सेवन करण्याची सवय होऊन जाते. 

अशा रुग्णांना हृदय रोगाचा त्रास असेल तर या गोळ्या खूप खतरनाक सिद्ध होऊ शकतात. अधिक प्रमाणात पेनकिलरचा वापर केल्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते. काही स्ट्राँग पेनकिलरने ब्लड प्रेशरही वाढू शकते किंवा कॅलेस्ट्रोलचा स्तर वाढू शकतो.  

ज्या व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन किलरचे सेवन करत असतील तर त्यांनी डॉक्टरांकडूनच या पेन किलरच्या दुष्परिणामांची माहिती घेतली पाहिजे. स्वतःच्या मर्जीनुसार गोळ्यांचे सेवन करत नाही.  खूपच गरज असेल तर पॅरासिटामोल सारखी हल्की पेन किलरचा वापर तुम्ही करू शकतात. परंतु ही सवय बनवू नका. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.