न्यूयॉर्क: जोडीदाराच्या घोरण्याच्या सवयीनं झोप उडली आहे का? तर हा व्यायाम करून पाहा. जीभ आणि तोंडाचा हा सोपा व्यायाम या समस्येतून सुटका मिळण्यास मदत करू शकतो. संशोधनात हे आढळलं आहे की, हा व्यायाम घोरण्याच्या सवयीला ३६ टक्के आणि घोरण्याच्या आवाजाला ५९ टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.
अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ केंटुकी कॉलेज ऑफ मेडिसिनच्या बारबार फिलीप यांनी सांगितले की, घोरण्याच्या समस्येसंबंधी अनेक लोकांना दिलासा देण्यासाठी हे संशोधन उपायकारक आणि विना शस्त्रक्रिया आहे.
घोरण्याच्या समस्येनी पीडित लोकांनी जीभेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेनं दाबावं त्यानंतर जीभेला पुन्हा खेचून घ्यावं. आता जीभेच्या पुढच्या भागास दातांना स्पर्श करत जीभेच्या मागील भागास टाळूच्या दिशेला दाबावे आणि 'ए' उच्चार करत टाळूला वर उचलावं. घोरण्याची समस्या कमी करण्याच्या संशोधनात हा व्यायाम सुचवण्यात आला आहे. या समस्येनं पीडित ३९ जणांनी हा व्यायाम केला आणि याचा परिणाम सकारात्मक होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.