ब्लड ग्रुपनुसार घ्यावा चहा

शरिरातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे रक्त. रक्तामुळे माणून जगत असतो. पण रक्ताचेही वेगवेगळे प्रकार आहेत. पण रक्त गटानुसार आहार घ्यावा असं काही दिवसांपूर्वी संशोधकांनी शोधून काढलं होतं.

Updated: Jan 31, 2016, 07:02 PM IST
ब्लड ग्रुपनुसार घ्यावा चहा title=

मुंबई : शरिरातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे रक्त. रक्तामुळे माणून जगत असतो. पण रक्ताचेही वेगवेगळे प्रकार आहेत. पण रक्त गटानुसार आहार घ्यावा असं काही दिवसांपूर्वी संशोधकांनी शोधून काढलं होतं.

चहा तर अनेकांच्या आवडीची गोष्ट. पण रक्त गटानुसार ही चहा प्यायला हवा असं एका संशोधनात समोर आलंय. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कोणता चहा घ्यावा.

१. 'ए' ब्लड ग्रुप : 'ए' ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींनी ग्रीन टी, मेरीगोल्ड टी, ओवा टी आणि चमेलीच्या झाडाच्या चहाचे सेवन करावे. कारण ही चहा प्यायल्याने तनाव कमी होतो आणि रिलॅक्स फिल होते. 

२. 'बी' ब्लड ग्रुप : 'बी' ब्लड ग्रुपच्या व्यक्तींचं वजन सहज वाढते कारण त्यांच्या कॅलरी या मंद गतीने कमी होतात. या लोकांनी लेमन बाम टी, तेजपत्ताची चहा, एल्डरबेरी टी, रुइबोस टी, रेड टी आणि ग्रीन टी सेवन केली पाहिजे. हे सेवन केल्याने मेटबॉलिज्म वाढेल आणि थकवा कमी येईल. अशा प्रकारची चहा प्यायल्याने झोप ही चांगली येते.

 
३. 'एबी' ब्लड ग्रुप : या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींनी कॉफी न घेता चहा प्यायला पाहिजे. या लोकांनी पुदीना, लेवेंडर फूल, ग्रीन टी आणि येलो टी घ्यायला हवी. या चहांचे सेवन केल्याने कामेच्छा वाढेल आणि तुम्हाला रिलॅक्स वाटेल.

4. 'ओ' ब्लड ग्रुप : ओ ब्लड ग्रुप असलेले लोक अॅसिडीटी आणि अपचनाच्या समस्येने त्रस्त असतात. कॉफी न घेता चहा घ्यावा. अदरक, जिनसेंग टी, येरबा मेट टी आणि ग्रीन टी घेणे फायदेशीर असते. कारण या चहा पनचतंत्रासाठी फायदेशीर असतात आणि पोटातील जळजळ दूर होते.