तमालपत्र वापराचे हे आहेत आश्चर्यकारक पाच फायदे

तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते.

Updated: Jan 20, 2016, 05:07 PM IST
तमालपत्र वापराचे हे आहेत आश्चर्यकारक पाच फायदे title=

मुंबई : तमालपत्राचा (दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते.
 
याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक आहे. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे. तसेच तमालपत्र खाणे एक अत्यंत फायद्याचे आहे.

तमालपत्राचे फायदे :

1. तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. पोटातील ज्या काही समस्या असतील तर तमालपत्रामुळे दूर होतात. चहामध्ये तमालपत्रचा वापर करा. कप, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.

2. तमालपत्राचा लाभ डायबिटीज रुग्णाला होता. सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हा तमालपत्राचा प्रभाव सकारात्मक दिसून येत आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे. ते त्यांना अधिक लाभदायक आहे.  

अधिक वाचा : जाणून घ्या, कंबर दुखीची कारणं

3. तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करा. काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्राशन करावे.  

4. तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करुन पिणे. किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते.  

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय

5. जर तुम्हाला वेदना होत असतील तर तमालपत्र हा त्यावर चांगला उपाय आहे. तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो. डोके दुखत असेल. मान दुखत असेल तर तेलाने मसाज केल्याने त्याचा लाभ मिळतो.