नवी दिल्ली : धावपळीच्या युगात बदलती जीवनशैली, अयोग्य आहार यामुळे शरीरातील चरबी वाढत आहे. याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही पौष्टिक खानपान आणि योग्य व्यायाम ही सूत्री वापरता का? इथे आम्ही तुम्हाला काही टिप्स देतोय ज्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी नियंत्रित होण्यास मदत होईल.
सॉफ्टड्रिंक टाळा : चरबी कमी करायची असेल तर प्राधान्याने सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळा. सॉफ्ट ड्रिंक्समधील साखर ही आरोग्यासाठी हानिकारक असते. तसेच फ्रॅक्टोजच्या अधिक मात्रामुळे चरबी वाढते.
कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करा : कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी केल्यास नक्कीच तुमची चरबी कमी होऊ शकते. लो-कार्बोहायड्रेट्स चरबी कमी करण्यास मदत करतात.
फायबरयुक्त भाज्यांचे सेवन करा : फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. फळे, भाज्या, अन्नधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.
एरोबिक्स करा : व्यायामामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अतिरिक्त चरबी कमी कऱण्यासाठी एरोबिक्सचा चांगलाच फायदा होतो. चालणे, धावणे,पोहण्यामुळे चरबी कमी होण्यात मदत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.