मुंबई : उन्हाळा सुरू झाला की शरिराला उर्जा मिळण्यासाठी खाल्लं जातं ते फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड रस्त्य़ावर कुठेही सहज उपलब्ध होतं. पण हे कलिंगड खाल्ल्याने तुम्हाला विविध आजारांना सामोरं जावं लागू शकतं. कारण स्वत:च्या लाभासाठी व्यापारी ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत.
कलिंगड ताज रहावं यासाठी व्यापारी त्यात केमिकल, रंग आणि सॅक्रिन यांच मिश्रण इंजेक्शनद्वारे कलिंगडाच्या आत सो़डतात. त्यामुळे कलिंगड ताजं राहतं आणि त्याला गडद लाल रंगही येतो.
व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी केलेल्या या कृतीचा ग्राहकांच्या शरिरावर वाईट परिणाम होऊ शकतो. असे कलिंगड खाल्याने पोटांचे आजार, जेवन पचवण्याची क्षमता कमी होणे, युरीन ब्लॅडर कॅंसर यासारखे आजार होऊ शकतात.