मुंबई : सकाळचा नाश्ता हा दिवसभर माणसाला ताजेतवाने ठेवायला मदत करतो. तसेच दिवसभरातील ताकद टिकवून ठेवण्याचे कामही सकाळचा हा नाश्ता करतो. त्यामुळे शरिराला ताकद देणारा असाचं नाश्ता करणे गरजेचे आहे.
सकाळच्या नाश्त्यात काय नसावं?
सकाळी फळांचा ज्यूस पिणे चुकीचे आहे. फळांमध्ये प्राकृतिकरित्या साखरेचे प्रमाण अधिक असते. ज्यूस भलेही ताजा असला, तरीही सकाळी तो घेणे चुकीचे आहे.
जर तुम्ही संत्र्याचे ज्यूस घेत असाल तर ते पाण्यासोबत घेणे फायदेशीर आहे.
कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असल्यामुळे जॅम टोस्ट खाणे चुकीचे आहे. जर टोस्ट खायचेचं असतील, तर त्या बरोबर अंड्याचा समावेश करा, ज्यात प्रोटिनचे प्रमाण अधिक असते.
पॅनकेक, चॉकलेटसारख्या प्रकारांचा समावेश सकाळच्या नाश्त्यात करणे टाळावे, कारण त्यात अतिरिक्त साखर मोठ्या प्रमाणात असते. सकाळच्या नाश्त्यामध्ये एवढ्या प्रमाणात साखरेचे सेवन करणे, आरोग्याला हानीकारक आहे.
पेस्ट्रीज, डोनट्स सारखे अती जास्त प्रमाणात असलेले कॅलेरीज खाणेही धोकादायक आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून गंभीर आजार होऊ शकतात. बर्गर, पॅटीस, समोसासारखे तेलकट पदार्थांचा समावेश नाश्त्यात कधीही करू नये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.