न्यूयॉर्क : तुम्हाला टक्कल पडत चाललंय, याची चिंता करण्याची आता गरज नाही, कारण शास्त्रज्ञांनी स्टेम सेल्सपासून केस उगवण्याचं एक नव तंत्र शोधून काढलं आहे. अमेरिकेतील सॅनफोर्ड-बर्नहम मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये असोसिएट प्रोफेसर असलेल्या एलेक्सी तर्सकिख यांनी, मानवी स्टेम सेल्सपासून केस उगवण्याची पद्धत शोधून काढलीय.
ही पद्धत सध्या प्रचलित असलेल्या पद्धतीपेक्षा अधिक उत्तम आहे. सध्या हेअर फॉलिकल डोक्यावरून दुसऱ्या जागी प्रत्योरोपण करण्यात येतं.
प्रोफेसर तर्सकिख यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्यावर केस स्टेम सेल्सने केस उगवण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र हेअर फॉलिकलच्या पद्धतीत असं काहीही नाही. यात केस उगवण्याची संख्या ही मर्यादीत आहे.
म्हणजेच एकाच वेळेस असंख्य केस तुमच्या डोक्यावर उगवता येऊ शकातात. मात्र हेअर फॉलिकलच्या बाबतीत तसं नाहीय. म्हणजेच एक हेअर फॉलिकलला एकच केस उगवता येतो, मात्र नैसर्गिकपणे एका फॉलिकलमध्ये अनेक केस असतात, तसेच स्टेम सेल्सच्या पद्धतीत उगवता येतील.
स्टेम सेल्स अशा सेल्स असतात, ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही अंगाची सेल्सच्या रूपाने वाढ करता येते. पीएलओएस वन या पत्रिकेत हे छापून आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.