जयपूर : जयपूरमध्ये एक १० वर्षांचा मुलगा पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर विराजमान झालेला दिसला. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या लहानग्याला १० वयाच्या दहाव्या वर्षीच एक दिवसासाठी का होईना पण आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली.
छोट्या गिरीषचं पोलीस कमिश्नर होण्याचं स्वप्न 'मेक-अ-विश' फाउंडेशन आणि राजस्थान पोलिसांनी मिळून पूर्ण केलंय. गिरीशला मोठं होऊन पोलीस आयुक्त व्हायचंय. पण, गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्यावर सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गिरीशला क्रोनिक किडनी मॉलफंक्शनचा आजार आहे.
मेक-अ-विश फाउंडेशनच्या कोऑर्डिनेटर सुनिता शाह यांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलं सायकल, खेळणी, किंवा एखाद्या प्रख्यात व्यक्तीस भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. मात्र, गिरिषने एका दिवसासाठी पोलीस कमिश्नर होण्याची इच्छा व्यक्त केली. हे थोडं कठीण होतं, मात्र जयपूर पोलिसांच्या मदतीने हे शक्य झालं.
एक दिवसाचा पोलीस कमीश्नर बनल्यानंतर गिरीष ज्यावेळी पोलिसांच्या खाकी वर्दीत, दिव्याच्या गाडीत पोलीस मुख्यालयात पोहचला... तेव्हा पोलिसांच्या तुकडीने त्याला सलामीदेखील दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.