नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापाठोपाठ काँग्रेसच्या 10 सरचिटणीसांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे.
या सरचिटणीसांचा कार्यकाल 15 जूनला संपतो आहे, त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या नव्या महासचिवांबाबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी निर्णय घेणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ राहुल गांधींच्या गळ्यात पडण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे, त्यामुळे राहुल गांधींच्या जवळच्या व्यक्तींची या सरचिटणीस पदावर वर्णी लागणार का याची उत्सुकता आहे.