नवी दिल्ली: उत्तर प्रदेश निवडणुकीला आता फक्त एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या तयारीला सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. या निवडणुकांमध्ये उमेदवारांना तिकीट देण्यासाठी भाजपनं अनोखी शक्कल लढवली आहे.
जे उमेदवार भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतील त्यांचे सोशल मिडीयावर 25 हजार फॉलोअर्स किंवा लाईक असले पाहिजेत. तसंच उमेदवार सोशल मिडीयावर किती सक्रिय आहे हे ही पाहिलं जाणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हे स्पष्ट केलं आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजप आणि नरेंद्र मोदींनी सोशल नेटवर्किंगचा प्रभावीपणे वापर केला होता, आणि केंद्रामध्ये भाजपची एक हाती सत्ता आली. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्येही भाजप सोशल नेटवर्किंगवर भर देणार हे निश्चित झालं आहे.