२ जी स्पेक्ट्रम घोटाळा: कनिमोझी, ए. राजा विरोधात आरोप निश्‍चित

२जी स्पेक्ट्रम वितरण घोटाळाप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोझी आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधींच्या पत्नी दयालू अम्मल यांच्यासह १९ जणांवर दिल्लीच्या पतियाळा हाऊस विशेष न्यायालयानं आज आरोप निश्‍चित केले आहेत. त्यामुळे राजा आणि कनिमोझी यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. 

Updated: Nov 1, 2014, 09:00 AM IST
२ जी स्पेक्ट्रम घोटाळा: कनिमोझी, ए. राजा विरोधात आरोप निश्‍चित title=

नवी दिल्ली: २जी स्पेक्ट्रम वितरण घोटाळाप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोझी आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधींच्या पत्नी दयालू अम्मल यांच्यासह १९ जणांवर दिल्लीच्या पतियाळा हाऊस विशेष न्यायालयानं आज आरोप निश्‍चित केले आहेत. त्यामुळे राजा आणि कनिमोझी यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. 

आरोप सिद्ध झाल्यास राजा, कनिमोझींसह अन्य आरोपींना तीन ते सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
२ जी घोटाळ्यासंबंधी एका प्रकरणी या सर्वानी काळ्या पैशाचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं या न्यायालयानं स्पष्ट केलंय.  

गुन्ह्यात सहभाग असल्याचे सर्व आरोपींना मान्य आहे की, त्यांना सुनावणी करायची आहे, असा प्रश्न आरोप निश्चित केल्यानंतर न्यायाधीशांनी केला. त्यावर सर्वच आरोपींनी सुनावणी घेण्याला सहमती दर्शविली. 
 

शाहीद उस्मान बलवा, विनोद गोयंका, कुसेगाव फ्रुटस् अँड व्हिजिटेबल्स लि., आसिफ बलवा, राजीव अग्रवाल, शरद कुमार, चित्रपट निर्माते करीम मोरानी आणि पी. अमृतम हे ए. राजा, कनिमोही आणि दयालू अम्माल यांच्याखेरीज अन्य आरोपी आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.