नवी दिल्ली : दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम २००६ मध्येच आपल्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणार होते, असा खळबळजनक खुलासा माजी सचि एस.एम.खान यांनी केला आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार 'माय डे विंथ द ग्रेटेस्ट हूमन सोल एवर' कार्यक्रमादरम्यान त्यांनी हा खुलासा केला.
बिहारचे त्यावेळचे तत्कालीन राज्यपाल बूटा सिंह यांनी बिहार विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली होती. कॅबिनेटमध्ये या शिफारशीला मान्यता दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता.
यादरम्यान राष्ट्रपती कलाम रशिया दौऱ्यावर होते.
जेव्हा डॉ. कलाम यांच्याकडे बिहार विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी नाखुशीने या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींचा हा आदेश फेटाळून लावला. यानंतर उच्च न्यायालयाने या प्रस्तावाला नामंजुरी दिली होती.
कलाम यांनी याप्रकणी त्यांच्या मोठ्या भावाशी चर्चा केली. मात्र कलाम यांचे भाऊही यांच्या राजीनाम्याविरोधात होते. अखेर कलाम यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला, असे स्पष्टीकरण खान यांनी दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.