लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील समेट घडवून आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अखिलेश आणि मुलायमसिंग वेगळी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, आपल्या उमेदवारांचे अॅफेडेव्हिट गोळा करण्याचे आदेश अखिलेश यांनी दिले आहेत. त्यामुळे वेगळी निवडणूक लढवून आपली ताकद दाखवून देण्याचा मार्ग अखिलेश यांनी निवडल्याचे स्पष्ट होतं आहे.
यासंदर्भात आज दुपारी मुलायम सिंग यादव पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार आहेत. दोघांनीही सायकल चिन्ह मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. आपल्याकडे सर्वाधिक सदस्यांचे संख्याबळ असल्यामुळे सायकल निवडणूक चिन्हावर अखिलेश यांनी दावा केला आहे.