www.24taas.com, नवी दिल्ली
समाजवादी पार्टीचे माजी नेता अमर सिंग यांना दुबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तेथील विमानतळावर चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
त्यांच्या दिल्लीतील घरी राहणाऱ्या त्यांच्या सहाय्यकाने सांगितले की, ५७ वर्षीय सिंग त्यांच्या नियमित चाचण्यांसाठी सिंगापुरला जात होते. तेव्हाच ते दुबई विमानतळावर चक्कर येऊन बेशुद्ध झाले. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे, मात्र स्थिर आहे असेही सहाय्यकाने सांगितले.
सिंग यांना दुबईतील वेलकेयर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. समाजवादी पार्टीतील खास असे मानले जाणारे अमर सिंग यांना काही वर्षापूर्वी किडनीच्या उपचारासाठी सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे सध्या तरी अमर सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.