नवी दिल्ली : हिमालयाच्या कुशीतील आव्हानात्मक अशा अमरनाथ यात्रेला सुरुवात झालीये. पहिल्या गटात 957 पुरुष, 187 महिला आणि 16 मुले आहेत.
हे सर्व भविक बालटाल येथील मार्गानं पवित्र गुंफेत पोहचतील. जम्मू येथून शुक्रवारी भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालेत. राज्याचे पर्यटनमंत्री गुलाम अहमद मीरने यात्रेला हिरवा झेंडा दाखवला होता. यात्रे दरम्यान रस्त्यांवर आणि बालटाप बेस कॅम्प परीसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
निर्सगाचं रौद्ररुप, बदलतं हवामान, अवघड वळणं आणि दहशतवादाच्या छायेत अमरनाथ यात्रा पूर्ण करणे म्हणजे भाविकांची कसोटी असते. पवित्र गुंफेत बर्फाच्छादित शिवलिंगाचं दर्शन घेण्याची प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.