नवी दिल्ली : दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. काही फटाक्यांमुळे आकाशात विविध रंगसंगती पाहायला मिळते. मात्र, आपल्या भारत मातेचा रंगबिरंगी फोटो पाहायला किती मजा येईल. नासाने उपग्रहाच्या माध्यमातून भारताचा एक फोटो घेतलाय. दिवाळीत भारत कसा दिसतो, याचे दर्शन या फोटोतून पाहायला मिळते.
पाहा हा फोटो
नासाने काढलेला भारताचा फोटो पाहण्यासाठी इथं क्लिक करा..
दरम्यान, या छायाचित्राला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नासाने असे छायाचित्र प्रसिद्ध केलेले नसल्याचे पुढे आले आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र व्हायरल होत आहे.
जो भाग विकसित आहे, तिथे नागरीकरण अर्थात जास्त झालेले आहे. म्हणून मुंबई, दिल्ली आणि इतर महानगरे, परिसर उजळलेली दिसतात. आता पाकिस्तानचा असा कोणते नागरिकरण झालेले आहे जे भारतापेक्षा जास्त दिसते ? नकाशाचा वरचा भाग, पाक अर्धा, सर्वात जास्त उजळला आहे. मात्र, याठिकाणी नागरिकन तेवढेसे झालेले नाही. त्यामुळे याबाबत सोशल मीडियावर चर्चा झडत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.