www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नाण्यांची निर्मिती करून ती चलनात आणण्याची परवानगी केवळ केंद्र सराकारला असते. मात्र, भारताचाच भाग असलेल्या अंदमान-निकोबार आईसलँड नावाची खोटी नाणी सध्या चलनात आल्याची माहिती नोटा व नाणी संग्रहाचे रविंद्र राठी यांनी दिली.
या नाण्यांवर भारत सरकारचा कोणताही उल्लेख आढळत नाही. ही नाणी एक, दोन, पाच रुपयांची आहेत. राठी यांच्याकडे सध्या २७० देशांची नाणी आहेत. त्यांना नाणी संग्रहाचा छंद आहे. ऑनलाईन नाणी खरेदी करताना एकदा त्यांना एका संकेतस्थळावर या नाण्यांची माहिती आढळून आली. संकेतस्थळावर ही नाणी विक्रीसाठी होती.
अंदमान -निकोबारमध्ये पर्यटकांची यामुळे फसवणूक होत असून चीनमधील एखाद्या कंपनीचा यात सहभाग असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाने याप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी राठी यांनी केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.