बरेली : आतापर्यंत भारतीय लष्करात सेवानिवृत्त झालेल्या श्वानांना इंजेक्शन देऊन मारले जात असेल मात्र आता असे होणार नाही. आता लष्करी पथकातील श्वानही सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण जीवन जगू शकणार आहेत. या श्वानांनी संपूर्ण जगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने दिलाय.
कोर्टाच्या आदेशानंतर आता लष्करी पथकातील सेवानिवृत्त श्वानांची आता खाण्यापिण्याची तसेच त्यांच्या राहण्याची योग्य काळजी घेतली जाणार आहे,
दिल्लीचे वकील संजय कुमार यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. लष्करी नियमानुसार यापूर्वी लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या कुत्र्यांना ठार केले जात असेल.
याविरोधातील याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती टीएस ठाकूर आणि न्यायमूर्ती जयंती नाथ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली . या सुनावणीत श्वानांना न मारण्याचे आदेश देण्यात आलेत.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करात श्नान दहा ते साडेदहा वर्षे तसेच घोडे २० ते २५ काम करु शकतात. त्यानंतर ते सेवानिवृत्त होतात.