दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले!

आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडलेत. डॉक्टरांच्या मते, केजरीवालांना तापासोबत कफचा त्रास आह. त्यांचा डायबिटीज पण कंट्रोलमध्ये नाहीय. 

Updated: Feb 12, 2015, 03:47 PM IST
दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले! title=

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडलेत. डॉक्टरांच्या मते, केजरीवालांना तापासोबत कफचा त्रास आह. त्यांचा डायबिटीज पण कंट्रोलमध्ये नाहीय. 

नुकत्याच झालेल्या टेस्टमध्ये त्यांची शुगर 170 वर होती. एका डॉक्टरांनी सांगितलं, "आम्ही त्यांना इन्सुलिनवर ठेवलंय. सोबतच ओरल औषधंही देण्यात येत आहेत."

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर अरविंद केजरीवाल मीडियासोबत बोलायला आले नाही. त्यांच्यासोबत गेलेले मनीष सिसोदिया यांनी कारमधून बाहेर येत मीडियाशी बातचित केली आणि पंतप्रधानांसोबतच्या भेटीबद्दल माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांची तब्येत बरी नाहीय. ते डायबिटीज आणि ब्रॉनकायटिसनं ग्रस्त आहेत आणि म्हणूनच हवेपासून संरक्षण करण्यासाठी ते नेहमी मफलरचा वापर करतात. 

दिल्लीतील निवडणुकीत आपनं 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या आहेत. 14 फेब्रुवारीला केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.