महासमुंद, छत्तीसगढ: 'दिव्य प्रेरणा प्रकाश ज्ञान परीक्षे'साठी आसाराम बापू समर्थकांनी शाळांमध्ये जे पुस्तकं वाटले, त्यात सेक्स एज्युकेशनच्या नावावर आक्षेपार्ह बाबी लिहिल्या आहेत. सरकारनं ही परीक्षा रद्द केलीय. मात्र हे पुस्तकं उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वाचत आहेत.
'दिव्य प्रेरणा प्रकाश' नावाच्या या पुस्तकात सेक्स पावर वाढविण्यासाठी सुरक्षित सेक्ससाठी टिप्स दिल्या गेल्या आहेत. तर पुस्तकाच्या कव्हर पेजवर हनुमानाशिवाय काही इतर महापुरुषांचे फोटो छापलेले आहेत.
काही शाळांमध्ये झाली परीक्षा
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुस्तकाच्या आधारे आसाराम समर्थकांनी महासमुंदच्या काही शाळांमध्ये परीक्षा सुद्धा घेतलीय. तुरुंगात असलेल्या आसाराम बापूची प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी शाळांच्या नावे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरकडून ऑर्डर घेतली होती. प्रकरणावर टीका होताच शिक्षण विभागानं मागे येत ही परीक्षा रद्द केली. ही परीक्षा आसाराम बापूच्या या पुस्तकाच्या आधारावर होणार होती. पुस्तकं शाळांमध्ये वाटली गेली. एकट्या महासमुंद जिल्ह्यातच ५ हजार पुस्तकं वाटलीत.
या पुस्तकाच्या कव्हर पेजवर स्वामी विवेकानंद आणि हनुमानाचा फोटो आहे. याशिवाय भीष्म पितामह, दयानंद सरस्वती, समर्थ रामदास, स्वामी लीलाशाह महाराज आणि महर्षि रमण यांचेही फोटो आहेत. कव्हर पेजवर लिहिलंय की, हे पुस्तक कमीतकमी पाच वेळा वाचा आणि शिकवा.
पुस्तकात सेक्स एज्युकेशन
पुस्तकाच्या दुसऱ्याच पानावर सेक्स एज्युकेशनची माहिती दिलीय. प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात ही माहिती आहे. यात शारिरीक संबंधांबद्दल खूप माहिती आहे. पाचव्या पानावर तर मुलं आणि पालकांच्या नावे आसाराम बापूसाठी संदेशही आहे. हे पुस्तकं लगेच परत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.