भारतीय जवानांचे हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याला आठवडाही होत नाही तोच दहशतवाद्यांनी बारामुल्लामध्ये पुन्हा भारतीय लष्करावर आत्मघाती हल्ला केलाय. 

Updated: Oct 3, 2016, 07:26 AM IST
भारतीय जवानांचे हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान title=

श्रीनगर : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याला आठवडाही होत नाही तोच दहशतवाद्यांनी बारामुल्लामध्ये पुन्हा भारतीय लष्करावर आत्मघाती हल्ला केलाय. 

दहशतवाद्यांनी यावेळी 46-राष्ट्रीय रायफलच्या कॅम्पला लक्ष करत अचानक हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख उत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र या हल्ल्यादरम्यान बीएसएफचा एक जवान शहीद झाला तर अन्य दोन जवान जखमी झालेत. 

बारामुल्ला शहरापासून हा कॅम्प 54 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथे राष्ट्रीय रायफलच्या 46 बटालियनचं मुख्यालय आहे. याच मुख्यालयाला अतिरेक्यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास लक्ष्य केलं. 

दरम्यान सध्या या परिसाला लष्करानं पूर्णपणे घेरलं असून या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे. बीएसएफच्या डीजींनी बारामुल्लामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना दिलीये. या हल्ल्यामुळे दिल्लीतील हालचालींना पुन्हा वेग आलाय.