बंगळुरु : देशातील आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळुरु शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसरीतील एका सहा वर्षीय विद्यार्थींनीवर शाळेतील एका पीटीच्या शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, शाळेच्या आवारात शिक्षकावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे येथील परिस्थिती चिघळली.
दुसरीतील मुलीला शाळेतील एका शिक्षकाने शिकार बनविल्याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज शाळेच्या बाहेर निदर्शने केली. यावेळी शाळेच्या बाहेर मोठ्याप्रमाणात जमाव जमला. यावेळी आरोपी शिक्षकाला ताब्यात देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. जमाव संतप्त झाला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगविले.
याआधी अशा घटना घडल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. अश्या घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गाने यावेळी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.