नवी दिल्ली : आता लवकरच 'बॉम्बे' हायकोर्टला 'मुंबई' हायकोर्ट म्हणावं लागेल, कारण बॉम्बे आणि मद्रास हायकोर्टाचं नामांतरण करण्यासाठी केंद्रानं हालचाली सुरु केल्या आहेत.
नामांतरणाच्या विधेयकावर केंद्रीय कायदे मंत्रालयाचं काम सुरु आहे. युती शासनाच्या काळात १९९० मध्ये दोन्ही शहरांची नावं बदलून बॉम्बेचं नाव मुंबई तर मद्रासचं चेन्नई करण्यात आलं. या नुसार आताच्या शहरांच्या नावानुसारच कोर्टाचं नाव असावं अशी मागणी, अनेक दिवसांपासून जोर धरते आहे.
१४ऑगस्ट १८६२ पासून बॉम्बे हायकोर्ट अस्तित्वात आलं, बॉम्बे हायकोर्टाची नागपूर, औरंगाबाद आणि गोवा हायकोर्ट अशी तीन खंडपीठं आहेत. तर मद्रास हायकोर्टाचं मदुराईला खंडपीठ आहे. या दोन उच्च न्यायालयांपाठोपाठच आता कलकत्ता हायकोर्टाचं नाव बदलून कोलकाता करण्याची मागणीही वाढू लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.