नवी दिल्ली : भाजपच्या १३० उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. तसेच १५० पेक्षा जास्त जागांवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपच्या १३० उमेदवारांची ही यादी भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यादी जाहीर करण्याचे अधिकार अमित शहा यांच्याकडे असल्याचं सांगण्यात येतंय.
युती चिरकाल अबाधित रहावी अशी आमची इच्छा असल्याचं भाजपचे राष्ट्रीय नेते राजीव प्रताप रूडी यांनी म्हटलं आहे. चर्चा बंद होण्यासारखं काहीही नसल्याचंही राजीव प्रताप रूडी यांनी म्हटलं आहे.
रविवारी भाजप- शिवसेना युती टिकेल किंवा नाही, यावर सर्वत्र चर्चा सुरू होती. या आधी महाराष्ट्राच्या जागावाटपावर भाजपच्या संसदीय समितीची बैठक झाली होती. या बैठकीत युती कायम ठेवण्यासाठी चर्चा करण्याच्या सूचना नरेंद्र मोदी यांनी दिल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.